Current Affairs In Marathi-24 October 2020-Chalu ghadamodi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

24 October 2020-Chalu ghadamodi ( चालू घडामोडी ) current Affairs in Marathi-24 October 2020,Chalu Ghadamodi 24 October.24 October-Dinvishesh,Chalu Ghadamodi For MPSC,MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi-24 October 2020
Current Affairs In Marathi-24 October 2020

Current Affairs In Marathi24 October 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • केंद्रीय संस्कृतीमंत्री प्रहलादसिंग पटेल यांच्या हस्ते “लाइफ इन मिनिएचर” प्रकल्प सुरू करण्यात आला ; नवी दिल्ली येथील नॅशनल म्युझियममधील सूक्ष्म पेंटिंग्ज या, गुगल आर्ट्स अँड कल्चर अ‍ॅपवर पाहता येतील.
 • सीबीएसईने विद्यार्थ्यां द्वारे डिजिटल दस्तऐवजांमध्ये प्रवेश करण्यासाठी “फेस रिकग्निशन” प्रणाली सुरू केली.
 • १९६२ च्या भारत-चीन युद्धावर आधारित जोगिंदर युद्ध स्मारकाचे उद्घाटन अरुणाचल प्रदेशातील बम ला येथे करण्यात आले; सुभेदार जोगिंदरसिंग यांना ‘परमवीर चक्र’ देऊन गौरविण्यात आले होते .
 • पृथ्वी विज्ञान मंत्रालय दक्षिण आशियाई देशांना फ्लॅश फ्लड गाइडेंस सेवा समर्पित करेल .
 • महाराष्ट्राने CBI ला दिलेली सहमती दूर करण्याचा निर्णय घेतला; एजन्सीला आता केस-टू-केस आधारावर राज्य सरकारकडे जावे लागेल.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In marathi

 • 2020 पर्यंत केंद्राने कांदा किरकोळ विक्रेते (2 टन) आणि घाऊक विक्रेते (25 टन) साठवणुकीची मर्यादा निश्चित केली.
 • 16 ऑक्टोबर रोजी संपलेल्या आठवड्यात परकीय चलन साठा 12 अब्ज अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचला.
 • GeM (Government eMarketplace) एकात्मिक खरेदी प्रणालीचे बांधकाम पूर्ण केले :मुख्य कार्यकारी अधिकारी तालीन कुमार
 • फ्लिपकार्टने आदित्य बिर्ला फॅशन आणि रिटेलमध्ये 8% हिस्सा 1,500 कोटी रुपयांना खरेदी केला .
 • टेक महिंद्राने तेन्झिंग ग्रुप, मोमेंटनला 293 कोटी रुपयांत विकत घेतले.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • अमेरिकेत भारतीय वंशाचे मतदार मोठ्या संख्ये आहेत. त्यामुळेच भारतीयांना आकर्षित करण्यासाठी दोन्ही मोठ्या पक्षांनी प्रयत्न सुरु केलेत.
 • याचा प्रत्यय सध्या निवडणुकींच्या बॅलेटकडे पाहिल्यावर येत आहे. अनेक भारतीय भाषांना बॅलेट मतदानपद्धतीमध्ये स्थान देण्यात आलं आहे.
 • यामध्ये हिंदीबरोबरच तेलगु, गुजराती, पंजाबी, तमीळ भाषांनाही स्थान देण्यात आलं आहे.
 • मिलन वैष्णव यांनी बॅलेट बॉक्सचा फोटो शेअर केला असून यामध्ये इंग्रजीबरोबरच हिंदी, तेलगु, गुजरातीसहीत एकूण पाच वेगवेगळ्या भाषा दिसत आहेत.
 • दुसऱ्या एका युझरने सॅण्टा क्लॅरा कंट्रीमध्ये मतदारांना ईमेलच्या माध्यमातून मत देताना सहा भारतीय भाषांचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
 • यामध्ये तामिळ, तेलगु, पंजाबी, हिंदी, गुजराती आणि नेपाळी भाषांचा समावेश आहे.
 • FATF ने (फायनान्शियल एक्शन टास्क फोर्स) पाकिस्तानला फेब्रुवारी 2021 पर्यंत ग्रे लिस्ट मध्ये स्थान दिले.
 • ऑक्टोबर 2020-जून 2021 मध्ये भारताला ILO (आंतरराष्ट्रीय कामगार संघटना) च्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले.
 • यूरोपीय संघ पर्यावरण मंत्री 2050 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जनाचे लक्ष्य कायदेशीर बंधनकारक करण्यास सहमत .
 • ब्रिटनने जपानबरोबर व्यापार करारावर स्वाक्षरी केली; पोस्ट-ब्रेक्सिट हा ब्रिटनमधील पहिला मोठा करार आहे
 • जागतिक आरोग्य संघटनेनुसार करोनाच्या गंभीर रुग्णात प्रभावी ठरत नसलेल्या रेमडेसिविर या औषधाला अमेरिकेच्या औषध प्रशासनाने मात्र करोनावरील पहिले अधिकृत औषध म्हणून मान्यता दिली आहे.
 • याआधी त्याला आपत्कालीन उपचारांसाठी मान्यता देण्यात आली होती.
 • या औषधाची निर्मिती करणाऱ्या कॅलिफोर्नियाच्या गिलीड सायन्सेस इन्कार्पोरेशन या संस्थेने म्हटले आहे, की रेमडेसिविर औषधामुळे करोना रुग्ण15 दिवसात बरे होण्याऐवजी दहा दिवसात बरे होऊ लागले.
 • या औषधाचे दुसरे नाव वेकलुरी असून ते औषध 12 वर्षांवरील किमान 40 किलोपेक्षा जास्त वजनाच्या व रुग्णालयात दाखल करण्याची वेळ आलेल्या करोना रुग्णांवर उपयोगाचे आहे.
 • पन्नास देशांत रेमडेसिविरला करोनावरील तात्पुरते औषध म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

24 October 2020 Dinvishesh

दिनविशेष 24 ऑक्टोबर

 • आज 24 ऑक्टोबर हा दिवस संयुक्त राष्ट्र दिन,जागतिक विकास माहिती दिन तसेच जागतिक पोलियो दिन आहे.
 • 24 ऑक्टोबर 1605 मध्ये मुघल सम्राट जहांगिर याचा राज्याभिषेक झाला.
 • सन 24 ऑक्टोबर 1851 मध्ये विल्यम लसेल यांनी उरेनस ग्रहाच्या अंब्रियाल व अरीयेल चंद्राचा शोध लावला.
 • सन 24 ऑक्टोबर 1945 मध्ये संयुक्त राष्ट्रांची (United Nations) स्थापना झाली.
 • 24 ऑक्टोबर 1984 भारतामध्ये प्रथमच भुयारी रेल्वे मध्ये कोलकाता येथे सुरू झाली.