Current Affairs In Marathi-15 October 2020-Chalu ghadamodi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

15 October 2020-Chalu ghadamodi (चालू घडामोडी) current Affairs in Marathi-15 October 2020,Chalu Ghadamodi 15 October.15 October-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi-15 October 2020
Current Affairs In Marathi-15 October 2020

Current Affairs In Marathi15 October 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • मंत्रिमंडळाने सहा राज्यांतील शालेय शिक्षणासाठी स्टार्स STARS (Strengthening Teaching-Learning and Results for States) प्रकल्प मंजूर केले; याला आंशिकपणे जागतिक बँकेकडून वित्तपुरवठा केला जातो.
 • स्टार्स’ या योजनेंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण देणे, परीक्षा पद्धतीत सुधारणा करणे, राज्या-राज्यांमध्ये अधिक समन्वय निर्माण करणे तसेच, आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करणे ही प्रमुख उद्दिष्टे असतील.
 • ही योजना महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, केरळ आणि ओडिशा या सहा राज्यांमध्ये राबवली जाणार असून बुधवारी त्याला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्याची माहिती केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
 • या योजनेसाठी जागतिक बँकेने 3,718 कोटींचा निधी दिला असून राज्ये 2 हजार कोटी देतील.
 • गुजरात, झारखंड, उत्तराखंड, आसाम आणि तमिळनाडू या पाच राज्यांसाठीदेखील अशीच योजना राबवली जाणार असून त्यासाठी आशियाई विकास बँक साह्य़ करणार आहे.
 • इयत्ता तिसरीपर्यंत विद्यार्थ्यांना भाषेची जाण येईल व त्या आधारावर परीक्षेची रचना केली जाईल. परीक्षा पद्धतीत सुधारणा केल्या जातील.
 • आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते ‘थॅलेसेमिया बाल सेवा योजने’चा दुसरा टप्पा सुरू.
 • केंद्र सरकारने बीएसएनल आणि एमटीएनएल या सार्वजनिक दूरसंचार कंपन्यांबाबत एक मोठा निर्णय घेतला आहे.
 • त्यानुसार, सर्व केंद्रीय मंत्रालये, सार्वजनिक विभाग आणि सार्वजनिक क्षेत्रांतील कंपन्यांमध्ये बीएसएनएल-एमटीएनएलची सेवा अनिवार्य करण्यात आली आहे. दूरसंचार विभागाने (डीओटी) याबाबत एक परिपत्रक काढले आहे.
 • दूरसंचार विभागाच्या परिपत्रकानुसार, भारत सरकारने आपली सर्व मंत्रालये/विभाग, सीपीएसई, केंद्रीय स्वायस्त संस्थांमध्ये बीएसएनएल आणि एमटीएनएलची सेवा अनिवार्य करण्यास मंजुरी दिली आहे.
 • 12 ऑक्टोबर रोजी हे परिपत्रक काढण्यात आलं आहे. अर्थ मंत्रालयाशी चर्चा केल्यानंतर केंद्र सरकारच्या सर्व सचिवालय आणि विभागांसाठी ही सेवा लागू करण्यात आली आहे.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

 • सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाने MSMEs च्या सहाययतेसाठी आपल्या एकल विंडो सिस्टम पोर्टल ”चॅम्पियन्स”ला मजबूत करण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग सुरू केले.
 • IMF च्या म्हणण्यानुसार 2020 मध्ये भारत (1877 डॉलर्स) दरडोई जीडीपीच्या बाबतीत बांगलादेश (1888 डॉलर्स) पेक्षा मागे असेल.
 • NMDC (राष्ट्रीय खनिज विकास महामंडळ) कडून छत्तीसगड आधारित नगरनार स्टील प्लांट (एनएसपी) च्या विसर्जनास मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • पूर्व लडाखमध्ये सीमावाद सुरु झाल्यापासून चीनची पीपल्स लिबरेशन आर्मी पँगाँग टीएसओच्या परिसरावर हायस्पीड गस्ती नौकांद्वारे लक्ष ठेवून आहे.
 • चीनकडून टाइप 305 आणि टाइप 928 डी बोटींचा वापर करण्यात येतो. या नौका स्वीडीश सीबी-90 ची कॉपी आहे.
 • चीन पँगाँग टीएसओ परिसरातील फक्त भूभागावरच नव्हे, तर पाण्याखालून कुठली हालचाल होऊ नये, यावरही चीन लक्ष ठेवून आहे.
 • भारत पाण्याखालून हल्ला करु शकतो,ही भीती चीनच्या मनात आहे.
 • जगभरातील नौदलं ज्या पाणबुडी विरोधी तंत्रज्ञानाचा वापर करतात, त्याचाच वापर चीनकडून सरु आहे.
 • फिंगर चार ते फिंगर आठ दरम्यान चीनने एकूण 13 बोटी तैनात केल्या आहेत. पँगाँग टीएसओ तलावात पाण्याखाली चालणाऱ्या हालचालींवर पीएलए एअर फोर्सने बारीक लक्ष ठेवायला सुरुवात केली आहे.
 • यासाठी पीएलओ एअर फोर्सने मॅग्नेटिक अ‍ॅनोमली डिटेक्टर बूम बसवलेल्या विशेष विमानांचा वापर सुरु केला आहे. विमानाच्या शेपटाकडे हे उपकरण असते.
 • पीएलएच्या नौदलाकडून पाणबुडीविरोधात Y-8 GX6 किंवा Y-8 या विमानांचा वापर केला जातो.
 • विकसनशील देशांना कोविड लस प्राप्त करण्यास मदत करण्यासाठी जागतिक बँकेने 12 अब्ज डॉलर्स मंजूर केले.
 • पॅलेस्टिनी शरणार्थींच्या मदतीसाठी भारताने UNWRA (युनायटेड नेशन्स रिलीफ अँड कन्स्ट्रक्शन एजन्सी) ला दहा लाख डॉलर्सचे योगदान दिले.
 • आंतरराष्ट्रीय सौर आघाडी (ISA) ची अध्यक्ष म्हणून भारत आणि फ्रान्स यांची पुन्हा निवड झाली.

15 October 2020 Dinvishesh

दिनविशेष 15 ऑक्टोबर

 • ‘जागतिक विद्यार्थी दिन’-15 ऑक्टोबर
 • 15 ऑक्टोबर1888 मध्ये गोपाळ गणेश आगरकर यांनी सुधारक पत्राची सुरूवात केली.
 • 15 ऑक्टोबर 1918 हा दिवस भारतीय गुरू आणि संत शिर्डीचे साई बाबा यांचा स्मृतीदिन आहे.
 • सन 15 ऑक्टोबर 1931 मध्ये वैज्ञानिक आणि भारताचे 11 वे राष्ट्रपती अवुल पाकिर जैनुलब्दीन उर्फ ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्म झाला.
 • सन 15 ऑक्टोबर 1968 मध्ये हरगोविंद खुराणा यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले.

आवश्य वाचा :- 14 ऑक्टोबर चालू घडामोडी