Current Affairs In Marathi-13 October 2020-Chalu ghadamodi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

13 October 2020-Chalu ghadamodi (चालू घडामोडी) current Affairs in Marathi-13 October 2020,Chalu Ghadamodi 13 October.13 October-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi-13 October 2020
Current Affairs In Marathi-13 October 2020

Current Affairs In Marathi13 October 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • राजनाथ सिंह यांनी 7 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये बीआरओ द्वारा (सीमा रस्ते संस्था) बांधलेल्या 44 पुलांचे उद्घाटन केले.
 • AICT ने AI, IOT आणि क्लाऊड संगणकीय यासारख्या नवीन तंत्रज्ञानामध्ये विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना प्रशिक्षण देण्यासाठी मायक्रोसॉफ्टबरोबर भागीदारी केली.
 • केरळने सर्व सार्वजनिक शाळांमध्ये हाय-टेक डिजिटल वर्गखोल्या सुरू केल्या : मुख्यमंत्री पिनारायि विजयन.
 • बिहार: राज्यमंत्री विनोदकुमार सिंग यांचे निधन.
 • तैवान-आशिया एक्सचेंज फाउंडेशन (TAEF) आणि भारताची नॅशनल मेरीटाइम फाउंडेशन (NMF) यांनी इंडो-पॅसिफिक क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी हातमिळवणी केली.
 • कामधेनू आयोगानं गाईच्या शेणापासून अँटी रेडिएशन चिप बनवल्याचा दावा केला आहे.
 • गाईचं शेण सगळ्यांना सुरक्षित ठेवेल. गाईचं शेण हे रेडिएशन विरोधी असल्याचं वैज्ञानिकरित्या सिद्ध झालेलं आहे.
 • गाईच्या शेणापासून बनवलेली अँटी रेडिएशन चिप रेडिएशन कमी करण्यासाठी मोबाईलमध्येही वापरता येऊ शकते.
 • आजारांविरोधात हे एक प्रकारे सुरक्षा कवच आहे,” असा दावा कामधेनू आयोगाचे अध्यक्ष वल्लभभाई कठीरिया यांनी केला आहे.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

 • केंद्राने आपल्या कर्मचार्‍यांना एकरक्कमी व्याजमुक्त महोत्सवासाठी 10,000 रुपयांची अग्रिम रक्कम जाहीर केली.
 • ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) वर आधारित किरकोळ चलनवाढ ऑगस्टमध्ये 6.69 टक्क्यांवरून सप्टेंबरमध्ये 34 टक्क्यांवर गेली.
 • ऑगस्टमधील औद्योगिक उत्पादनात 8 टक्क्यांनी घट.
 • एक्झिम बँक कनेक्टिव्हिटी प्रकल्पासाठी मालदीवला 400 दशलक्ष कर्ज देते
 • पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी कुवेतला भेट दिली; त्यांनी नवीन अमीर शेख नवाफ अल-अहमद अल-जबर अल-सबा यांची भेट घेतली.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • पॉल मिलग्रोम, रॉबर्ट विल्सन यांनी अर्थशास्त्रातील 2020 नोबेल पुरस्कार जिंकला.
 • मिलग्रोम आणि विल्सन यांना हा पुरस्कार लिलावाचा सिद्धांतात सुधारणा आणि नव्या पद्धतींच्या शोधांसाठी देण्यात आला आहे.
 • हे दोघेही अमेरिकेच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात कार्यरत आहेत. त्यांनी अशा वस्तू आणि सेवांसाठी लिलावाची नवी प्रक्रिया तयारी केली ज्या पारंपारिक पद्धतीने विकणे कठीण आहे.
 • या पद्धतीच्या शोधामुळे जगभरातील विक्रेते, खरेदीदार आणि करदात्यांना त्याचा मोठा फायदा झाला आहे.
 • FATF चा एशिया पॅसिफिक ग्रुप दहशतवाद्यांच्या वित्तपुरवठ्याविरूद्ध मंद प्रगतीसाठी पाकिस्तानला ‘enhanced follow-up list’ मध्ये ठेवले .
 • अमेरिकेतील जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सननंही करोनावर लस निर्माण केली आहे. मात्र, या लशीच्या चाचण्या अचानक काही काळासाठी थांबवण्यात आल्या आहेत.
 • स्वयंसेवकांच्या शरीरावर दुष्परिणाम दिसून आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.
 • अमेरिकेत मॉर्डना, पीफायझर या कंपन्यांप्रमाणे जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सनने करोनावर लस शोधून काढली आहे.
 • या लशीच्या चाचण्या सध्या सुरू आहेत. प्रायोगिक लशीचा सिंगल डोस दिल्यानंतर स्वयंसेवकांमध्ये करोना व्हायरस विरोधात लढण्यासाठी मजबूत रोगप्रतिकारक शक्ती निर्माण झाली.
 • जॉन्सन अँड जॉन्सनच्या Ad26.COV2.S लशीचे दोन डोस घेतल्यानंतरही स्वयंसेवकांच्या शरीरावर कुठलेही दुष्परिणाम दिसले नव्हते. त्यामुळे ही लस करोनावर अत्यंत प्रभावी समजली जात आहे.

क्रीडा चालू घडामोडी-Sports Current Affairs In Marathi

 • भारताचा फुटबॉल संघाचे माजी कर्णधार कार्ल्टन चॅपमन यांचे निधन झाले.
 • ते 49 वर्षांचे होते. बायचुंग भूतिया, आय. एम. विजयन आणि चॅपमन असे त्रिकूट 1990च्या दशकात प्रसिद्ध होते.
 • 1990च्या सुरुवातीला टाटा फुटबॉल अकादमीकडून त्यांची कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1997 मध्ये सॅफ चषक पटकावला होता.
 • 1996-97 मध्ये झालेली पहिलीवहिली नेशन्स फुटबॉल लीग जेसीटीने जिंकण्यात चॅपमन, भूतिया आणि विजयन या त्रिकुटाचे योगदान मोलाचे राहिले.

13 October 2020 Dinvishesh

दिनविशेष 13 ऑक्टोबर

 • आंतरराष्ट्रीय नैसर्गिक आपत्ती निवारण दिन 13 ऑक्टोबर
 • 13 ऑक्टोबर 1877 मध्ये स्वातंत्र्यसेनानी होमरुल चळवळीतील कार्यकर्ते ‘भुलाभाई देसाई‘ यांचा जन्म झाला.
 • 13 ऑक्टोबर 1773 मध्ये चार्ल्स मेसियर यांनी व्हर्लपूल गॅलेक्सीचा शोध लावला.
 • सन 13 ऑक्टोबर 1929 या वर्षी पुण्यातील पर्वती देवस्थान दलितांना खुले झाले.

आवश्य वाचा :- चालू घडामोडी 12 ऑक्टोबर