Current Affairs In Marathi-08 October 2020-Chalu ghadamodi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

08 October 2020-Chalu ghadamodi (चालू घडामोडी) current Affairs in Marathi-08 October 2020,Chalu Ghadamodi 08 October.08 October-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi
Chalu ghadamodi 08 October

Current Affairs In Marathi08 October 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • आज 8 ऑक्टोबर म्हणजेच भारतीय हवाई दलाचा वर्धापनदिन. 88 वर्षांपूर्वी 1932 साली आजच्याच दिवशी भारतीय हवाई दलाची स्थापना झाली.
 • मागील नऊ दशकांमध्ये भारतीय हवाई दलाने गरुड झेप घेतली आहे. आजच्या 88 व्या वर्धापनदिनानिमित्त जाणून घेऊयात भारतीय हवाई दलाबद्दलच्या काही खास गोष्टी
 • ‘नभ:स्पृशं दीप्तम्।‘ हे भारतीय हवाई दलाचे ध्येयवाक्य आहे. या वाक्याचा भाषांतर वैभवाने आकाश स्पर्श करा असे होते.
 • भारताचे भूतपूर्व राष्ट्रपति राधाकृष्णन् यांनी हवाई दलाचे ध्येयवाक्य म्हणून हे वाक्य सुचविले.
 • सुब्रोतो मुखर्जी हे पहिले भारतीय एका स्क्वाड्रनचे वायुदलातले प्रमुख होते.
 • 12 मार्च इ.स. 1945 रोजी वायुदलाचे नाव रॉयल इंडियन एअरफोर्स असे झाले. 1950 मध्ये भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या नावातील रॉयल हा शब्द वगळण्यात आला.
 • सार्वजनिक ठिकाणी अनिश्चित काळासाठी कब्जा स्वीकारार्ह नाहीः नवी दिल्लीतील शाहीन बागवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेली टिप्पणी
 • UGC ने 24 विद्यापीठे बनावट घोषित केली; यूपीमध्ये जास्त 8, दिल्लीतील 7 बनावट विद्यापीठे.
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने जपानबरोबर सायबर सुरक्षा करारावर सही करण्यास मान्यता दिली.
 • भारताने आपल्या क्षेपणास्त्र कार्यक्रमाला गती दिली आहे. पूर्व लडाख सीमेवर चीनबरोबर संघर्षाची स्थिती आहे. त्या पार्श्वभूमीवर मागच्या 40 दिवसात भारताने चार क्षेपणास्त्र चाचण्या केल्या.
 • एका क्षेपणास्त्र LAC वर तैनात केले. सैन्य दलात औपचारिक समावेश करण्याआधीच परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, मंजुऱ्या देण्यात आल्या आहेत.
 • पाच हजार किलोमीटर रेंज असलेल्या K-5, या पाणबुडीतून डागल्या जाणाऱ्या क्षेपणास्त्राच्या निर्मितीमध्ये सुद्धा प्रगती झाली आहे.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

 • दररोज 41 दशलक्ष व्यवहारासह रिअल-टाइम आर्थिक व्यवहारात भारत जागतिक क्रमांकावर आहे.
 • मॉरिशसकडून मिळालेल्या एफडीआयद्वारे वित्त कंपन्या स्थापन करता येणार नाहीतः RBI
 • कोटक म्युच्युअल फंडाचे एमडी निलेश शाह यांना AMFI चे अध्यक्ष म्हणून निवडले गेले (असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया).
 • केंद्रीय मंत्रिमंडळाने स्टॉकहोम कन्वेंशनच्या अनुसमर्थनास मान्यता दिली, 7 धोकादायक रसायनांवर बंदी घातली.
 • अमॅझॉन, अ‍ॅपल, फेसबुक व गूगल या कंपन्यांनी त्यांच्या मक्तेदारीच्या अधिकाराचा वापर आणि दुरुपयोग केल्याचे स्पष्ट करीत अमेरिकेच्या ‘हाऊस ऑफ रिप्रेझेंटिटिव्हज’च्या एका समितीने कायद्यांमध्ये सुधारणा करून बडय़ा कंपन्यांची मक्तेदारी मोडीत काढा अशी शिफारस केली आहे.
 • जगातील सर्वात मोठय़ा असलेल्या या तंत्रज्ञान कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत 15 महिने तपास केल्यानंतर संबंधित कायद्यांमध्ये बदल करण्याचे सुचविण्यात आले आहे.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर आणि जपानचे समकक्ष तोशिमिट्सु मोटेगी यांनी टोकियोमध्ये भारत-जपान सामरिक संवादात भाग घेतला.
 • जागतिक बँकेने आपला द्वैवार्षिक दारिद्र्य आणि सामायिक समृद्धी अहवाल जारी केला; 2021 पर्यंत 150 दशलक्ष लोक अत्यंत गरीबीत सापडण्याची शक्यता आहे.
 • जनुकीय संपादनासाठी वापरण्यात येणाऱ्या रेणवीय कात्र्यांच्या संशोधनाला यंदा रसायनाशास्त्राचे नोबेल जाहीर झाले.
 • या संशोधनामुळे रोगकारक जनुके काढून अनेक आनुवंशिक आजार तसेच कर्करोगही बरा करता येणे शक्य आहे.
 • रसायनशास्त्राचे हे नोबेल फ्रान्सच्या इमॅन्युएल शापेंटी आणि अमेरिकेच्या जेनिफर ए. डाउडना यांना विभागून देण्यात येणार आहे.
 • दोन महिलांनी रसायनशास्त्राचे नोबेल पटकावण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्यांनी प्राणी आणि माणसातील सदोष जनुके काढून टाकण्यासाठीचे ‘क्रिस्पर’ किंवा ‘कॅस 9’ तंत्रज्ञान शोधून काढले होते.
 • ही पद्धत वनस्पती व सूक्ष्मजीवातील घातक किंवा सदोष जनुके काढून टाकण्यासाठी वापरता येते.
 • रेणवीय कात्र्यांचे हे जनुकीय साधन विशेष परिणामकारक असल्याचे रसायनशास्त्राच्या नोबेल समितीचे अध्यक्ष क्लेस गुस्ताफसन यांनी म्हटले आहे.
 • रशियाने नवीन हायपरसॉनिक अँटी-शिप क्रूझ क्षेपणास्त्र ‘सिर्सकॉन’ ची चाचणी घेतली.
 • प्रगत लोकशाहींमध्ये चीनबद्दल नकारात्मक समज वेगाने वाढत आहे: प्यू रिसर्च सेंटर सर्व्हे

08 October 2020 Dinvishesh

दिनविशेष 08 ऑक्टोबर

 • 8 ऑक्टोबर 1922 मध्ये संशोधक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जैवभौतिक शास्त्रज्ञ गोपालसमुद्रम नारायण अय्यर रामचंद्रन तथा डॉ. जी.एन. रामचंद्रन यांचा जन्म झाला
 • 8 ऑक्टोबर1959 मध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांना पुणे विद्यापीठाने सन्माननीय डी-लिट पदवी घरी येऊन दिली.
 • सन 8 ऑक्टोबर 2001 मध्ये 11 सप्टेंबरच्या WTC वरील अतिरेकी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अंतर्गत सुरक्षा मंत्रालयाची (Department of Homeland Security) स्थापना केली.