06 October 2020-Chalu ghadamodi-current Affairs in Marathi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

06 October 2020-Chalu ghadamodicurrent Affairs in Marathi,Chalu Ghadamodi 06 October.06 October-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi
Chalu ghadamodi 06 October 2020

Current Affairs In Marathi06 October 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • 👉वाढीव कौटुंबिक पेन्शनसाठी सरकारने संरक्षण कर्मचार्‍यांची किमान पात्रता सेवेच्या आवश्यकता काढून टाकल्या.
 • DRDO ने Supersonic Missile Assisted Release of Torpedo (SMART) ची यशस्वीरित्या चाचणी केली.
 • भारत बायोटेकच्या लसीची दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू.
 • देशात सध्या करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीत करोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी भारतात लस विकसित करण्यात येत आहे.
 • करोनावरील लस विकसित करत असलेल्या भारत बायोटेकच्या लसीची सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे.
 • अशातच भारत बायोटेकनं एक महत्त्वाची माहिती दिली आहे. कोव्हॅक्सीन या लसीत भारत बायोटेक असं औषध वापरणार आहे ज्यामुळे प्रतिकारक शक्ती अधिक आणि मोठ्या कालावधीसाठी वाढणार आहे.
 • भारत बायोटेक आपल्या कोव्हॅक्सीन या लसीत Alhydroxiquim-II या औषधाचा वापर करणार आहे.
 • Alhydroxiquim-II सहाय्यक म्हणून काम करणार असून त्यामुळे रोगप्रतिकारशक्ती अधिक वाढणार आहे.
 • ब्रिक्स वार्षिक परिषदेच्या निमित्ताने मोदी- जिनपिंग यांची आभासी भेट.
 • पूर्व लडाखमध्ये प्रत्यक्ष ताबा रेषेवर तणाव निर्माण झाल्यानंतर पहिल्यांदाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांचा 17 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या ब्रिक्स वार्षिक परिषदेच्या निमित्ताने आभासी संवाद होण्याची शक्यता आहे.
 • ब्रिक्सची वार्षिक परिषद 17 नोव्हेंबरला दूरचित्रसंवादाद्वारे होईल, असे पाच राष्ट्रांच्या या संघटनेचा अध्यक्ष असलेल्या रशियाने सोमवारी जाहीर केली.
 • 3.6 दशलक्षाहून अधिक, किंवा जगाच्या निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करणारा ब्रिक्स (ब्राझिल- रशिया, भारत- चीन- दक्षिण आफ्रिका) हा एक प्रभावशाली गट म्हणून ओळखला जातो. ब्रिक्स देशांचे एकूण 16.6 ट्रिलियन अमेरिकी डॉलर्सचे सकल राष्ट्रीय उत्पन्न आहे.
 • ‘जागतिक स्थैर्य, सामायिक सुरक्षा आणि नाविन्यपूर्ण विकासाकरता ब्रिक्स भागीदारी’ ही ब्रिक्स देशाच्या नेत्यांच्या बैठकीची संकल्पना आहे’, असे रशियन सरकारने एका निवेदनात सांगितले.
 • पंतप्रधान नरेंद्र मोदी व चीनचे अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी गेल्या काही वर्षांमध्ये ब्रिक्सच्या सर्व परिषद बैठकांमध्ये भाग घेतला आहे.
 • हे दोन्ही नेते आभासी परिषदेतही सहभागी होणार आहेत, अशी माहिती या बहुपक्षीय परिषदेच्या तयारीशी संबंधित असलेल्या एका राजनैतिक अधिकाऱ्याने दिली.
 • गेल्या वर्षी ब्रिक्स परिषद ब्राझिलची राजधानी ब्राझिलिया येथे झाली होती. तिच्या निमित्ताने मोदी व जिनपिंग यांची द्विपक्षीय बैठकही झाली होती.

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi06 October 2020-Chalu ghadamodi

 • येत्या 8 ऑक्टोबरला साजरा होत असलेल्या हवाई दल दिनाच्या संचलनात राफेल लढाऊ विमाने सहभागी होणार आहेत.
 • 1932 मध्ये 8 ऑक्टोबरला भारतीय हवाई दलाची स्थापना झाली होती, त्यामुळे हा दिवस ‘हवाई दल दिन’ म्हणून साजरा केला जातो.
 • यंदा गाझियाबाद येथील हिंडन हवाईतळावर वार्षिक संचलन होणार आहे. इतर विमानांबरोबरच राफेल विमाने त्या दिवशी सहभागी होतील.
 • भारतीय हवाई दलाच्या एएफडे 2020 या हॅशटॅगवर म्हटले आहे,की राफेल ही लढाऊ जेट विमानांची नवी आवृत्ती आहे.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

 • पंतप्रधाना नि आर्टिफिशियल इंटेलिजेंस ‘RAISE 2020’ (Responsible AI for Social Empowerment 2020) चे उद्घाटन केले .
 • आईबीएम, GeM (Government e-Marketplace) सह कृत्रिम बुद्धिमत्ता केंद्र स्थापित करेल.
 • C-DAC NVIDIA सह भारताचा वेगवान एचपीसी-एआय सुपर कॉम्प्यूटर ‘परम सिद्धि – एआय’ला कमिशन करेल .
 • प्रधान मंत्री स्वानिधी योजनेंतर्गत शहरातील खाद्यपदार्थ विक्रेत्यांना ऑनलाईन आणण्यासाठी नागरी व्यवहार मंत्रालयाने स्विगी बरोबर सामंजस्य करार केला.
 • चीनी कंपनी लेनोवोने मोटोरोला रेज़र 5 जी फोल्डेबल फोन भारतात बाजारात आणला, किंमत 1,24,999 रुपये आहे.

टेस्ला भारतात गिगाफॅक्ट्री उभारण्याच्या तयारीत:

 • कर्नाटकमधील बंगळुरु शहरामध्ये राज्य सरकारने टेस्ला या इलेक्ट्रीक कारच्या गिगाफॅक्ट्रीसाठी तयारी सुरु केली आहे.
 • यासंदर्भात अमेरिकेतील अग्रगण्य कंपन्यांपैकी एक असणाऱ्या टेस्लासोबत एक बैठकही पार पडली असून भारतामधील संशोधन आणि कंपनीचा देशात विस्तार करण्याच्या दृष्टीने आवश्यक असणाऱ्या इतर कामांसंदर्भातील केंद्र उभारण्यासाठी जमीन देण्यास कर्नाटक सरकार उत्सुक आहे.
 • टेस्ला कंपनीला रिसर्च अ‍ॅण्ड डेव्हलपमेंट (आर अ‍ॅण्ड डी) सेंटर उभारण्यासाठी तसेच निर्मितीच्या दृष्टीने कारखाना उभारण्यासाठी हवी असणारी सर्व मदत करण्यास तयार आहोत.
 • इलेक्ट्रीक व्हेइकल्ससाठी बंगळुरु हे उत्तम ठिकाण आहे.
 • टेस्ला या आयत्या तयार इकोसिस्टीमचा फायदा घेऊ शकते,” असं कर्नाटकच्या आर्थिक आणि औद्योगिक विभागाचे मुख्य अर्थ सचिव असणाऱ्या गौरव गुप्ता यांनी द इकनॉमिक टाइम्सशी बोलताना सांगितलं.
 • कार गिगाफॅक्ट्रीमध्ये टेस्लाच्या गाड्या, बॅटरींचे उत्पादन घेतलं जाईल असंही गुप्ता यांनी स्पष्ट केलं.
 • टेस्लाचे भारतातील पहिलं केंद्र बंगळुरुमध्ये उभारण्यासाठी प्रशासन जोमाने तयारीला लागलं आहे. जुलै महिन्यामध्ये टेस्लाने टोयोटाच्या ताब्यातील युनिट ताब्यात घेतलं आहे.
 • याचप्रमाणे इथर एनर्जी, बॉश, डियामेलर, महिंद्रा इलेक्ट्रॉनिक्स, ओला मोबॅलिटी यासारख्या कंपन्याही याच भागामध्ये आहेत.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • हॅपेटायटीस सी विषाणूच्या शोधासाठी हार्वे जे. अ‍ॅल्टर, मायकेल ह्यूटन, चार्ल्स एम. राईस यांना संयुक्तपणे शरीरविज्ञान किंवा औषधोपचारातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
 • यकृताचा कर्करोग आणि यकृताची सूज या रोगांना कारणीभूत ठरणाऱ्या ‘हेपॅटायटिस सी’ या विषाणूच्या शोधाबद्दल अमेरिकी शास्त्रज्ञ हार्वे जे. ऑल्टर, चार्ल्स एम. राइस आणि ब्रिटिश शास्त्रज्ञ मायकेल हॉटन यांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार सोमवारी संयुक्तपणे जाहीर करण्यात आला.
 • ऑल्टर, राइस आणि हॉटन यांच्या कार्यामुळे रक्तातील ‘हेपॅटायटिस सी’ या रोगाचे मुख्य कारण स्पष्ट होण्यास मदत झाली.
 • त्याचबरोबर चाचण्या आणि औषधे विकसित करून लाखो लोकांचे प्राण वाचवणे शक्य झाले, अशा शब्दांत नोबेल समितीने शास्त्रज्ञांचा गौरव केला.
 • वैद्यकशास्त्रातील या ऐतिहासिक शोधाबद्दल नोबेल समितीने तिन्ही शास्त्रज्ञांविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
 • त्यांच्या शोधामुळे ‘हेपॅटायटिस सी’ विषाणूविरोधी औषधांची निर्मिती वेगाने करता आली.
 • फ्रांको-जपानी फॅशन डिझायनर केन्झो टाकाडा यांचे वयाच्या 81 व्या वर्षी कोविड -19 मुळे निधन झाले.
 • 5 ऑक्टोबर रोजी जागतिक अधिवास दिन साजरा करण्यात आला; थीम: ‘सर्वांसाठी घरे: एक चांगले शहरी भविष्य’.
 • काल 5 ऑक्टोबर रोजी जागतिक शिक्षक दिन साजरा करण्यात आला.
 • 26-27 ऑक्टोबर दरम्यान भारत आणि अमेरिकेत तिसरी टू प्लस टू चर्चा होण्याची शक्यता आहे.
 • या बैठकीत नरेंद्र मोदी सरकार भू-स्थानिक सहकार्यासाठी BECA करारावर स्वाक्षरी करु शकते.
 • अमेरिकेकडून MQ-9B हे सशस्त्र ड्रोन विकत घेण्यासाठी बीईसीए करार अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
 • शत्रूच्या प्रदेशातील लक्ष्यावर अचूकतेने प्रहार करण्यासाठी ही अमेरिकन ड्रोन विमाने भू-स्थानिक डाटाचा वापर करतात.
 • BECA करारामुळे भारताला अमेरिकेचे भू-स्थानिक नकाशे वापरण्याची मुभा मिळणार आहे.
 • याच आठवडयात मंत्री स्तरावरील चर्चेतून भारत-अमेरिकेतील संवादाचा विस्तार होणार आहे.
 • येत्या सहा ऑक्टोबर रोजी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर अमेरिकन समकक्ष माइक पॉम्पियो यांची टोक्योत भेट घेतील.
 • ऑक्टोंबरच्या अखेरीस अमेरिकेचे संरक्षण मंत्री मार्क इस्पर आणि राजनाथ सिंह दोन्ही देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांसोबत टू प्लस टू चर्चेत सहभागी होतील. हिंदुस्थान टाइम्सने हे वृत्त दिले आहे.

06 October 2020 Dinvishesh

दिनविशेष 06 ऑक्टोबर

 • 6 ऑक्टोबर 1866 मध्ये डिओटेलेफोनी चे संशोधक रेगिनाल्ड फेसेनडेन यांचा जन्म झाला.
 • 6 ऑक्टोबर 1949 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या (NDA) इमारतीची कोनशिला बसवण्यात आली.
 • सन 6 ऑक्टोबर 1963 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राचे सांगली हे उपकेंद्र सुरू झाले.
 • 6 ऑक्टोबर 2007 या वर्षी जेसन लुइस ने वल्ह्याच्या होडीतुन पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली.

नक्की वाचा :- चालू घडामोडी 05 ऑक्टोबर.