05 October 2020-Chalu ghadamodi-current Affairs in Marathi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

05 October 2020-Chalu ghadamodi-current Affairs in Marathi,Chalu Ghadamodi 05 October.05 October-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi
Chalu Ghadamodi

Current Affairs In Marathi 05 October 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • निवडणूक आयोगाने वृद्ध ,दिव्यांगसाठी (80+) टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाची प्रक्रिया जारी केली.
 • इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय आणि NITI आयोगाच्या वतीने कृत्रिम बुद्धिमत्ता RAISE 2020’(Responsible AI for Social Empowerment 2020) समिट 5 ते 9 ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आले.
 • कोलकाता मधील पूर्व पश्चिम मेट्रो कॉरिडोरच्या फुलबागान स्थानकाचे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी वर्चुअली उद्घाटन केले.
 • जुलैपर्यंत 25 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल:
 • करोनाचा प्रादुर्भाव वाढत असताना रविवारी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी दिलासादायक माहिती दिली.
 • करोना प्रतिबंधक लशीच्या 40-50 कोटी मात्रा (डोस) उपलब्ध करून 2021च्या जुलैपर्यंत 20-25 कोटी लोकांचे लसीकरण करण्यात येईल, असे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
 • लसीकरणात करोना साथनियंत्रणासाठी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल.
 • लशीचे डोस तयार झाल्यानंतर सर्व राज्यांना योग्य आणि न्याय्य पद्धतीने त्यांचे वितरण करण्यात येईल, अशी ग्वाही आरोग्यमंत्र्यांनी ‘संडे संवाद’ कार्यक्रमात बोलताना दिली.
 • समुद्रसपाटीपासून 10 हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा:
 • पंतप्रधान मोदी यांनी ज्या अटल बोगद्याचे उद्घाटन शनिवारी केले, तो समुद्रसपाटीपासून 10 हजार फूट उंचीवरचा महामार्गावरील जगातील सर्वात लांब बोगदा आहे.
 • मनाली ते लेह हे अंतर त्यामुळे 46 कि.मी.ने कमी होणार असून प्रवासाचा कालावधी चार ते पाच तासांनी कमी होणार आहे.
 • हा बोगदा 9.02 कि.मी.चा असून तो मनाली ते लाहौल-स्पिती या भागांना जोडतो. आता सर्व हवामानात ही वाहतूक सुरू राहील, एरवी सहा महिने हिमवृष्टीमुळे या भागाचा संपर्क इतर देशापासून तुटत होता.
 • पीर पांजाल पर्वतराजीत 3 हजार मीटर म्हणजे 10 हजार फूट उंचीवर अत्याधुनिक तंत्रज्ञानाने त्याची बांधणी केली आहे.
 • दक्षिण पोर्टल मनालीपासून 25 कि.मी अंतरावर व 3060 मीटर उंचीवर आहे.
 • उत्तर पोर्टल हे लाहौल खोऱ्यात सिसू येथील तेलिंग खेडय़ाजवळ 3071 मीटर उंचीवर आहे. घोडय़ाच्या नालेसारखा त्यातील मार्गिकांचा आकार असून या प्रकल्पाला 3300 कोटी रुपये खर्च आला आहे.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

 • प्रादेशिक ग्रामीण बँकांना आर्थिक वर्ष 2020 मध्ये 2,026 कोटी रुपयांचे नुकसान झालेः NABARD (कृषी व ग्रामीण विकास नॅशनल बँक)
 • फोर्ब्सच्या ‘जगातील सर्वाधिक प्रभावशाली सीएमओ’ (मुख्य विपणन अधिकारी) च्या यादीत एचडीएफसी बँकेचे रवी संथनम हे एकमेव भारतीय आहेत.
 • ग्रेटर नोएडा (उत्तर प्रदेश) येथे शिव नादर युनिव्हर्सिटी-डसॉल्ट सिस्टम सेंटर ऑफ एक्सलन्स (SDC) ची स्थापना केली गेली.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • दक्षिण पॅसिफिकमधील न्यू कॅलेडोनियाने जनमत संग्रहात फ्रान्सपासून स्वातंत्र्याचा प्रस्ताव फेटाळला.
 • चक्रीवादळ अ‍ॅलेक्स मुळे आणि फ्रान्स आणि इटलीच्या काही भागांवर परिणाम झाला.
 • सौदी अरेबियाने मक्का येथे उमरा यात्रेला प्रारंभ केला.

05 October 2020 Dinvishesh

दिनविशेष 05 ऑक्टोबर

 • 5 ऑक्टोबर हा दिवस जागतिक शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो.
 • 5 ऑक्टोबर 1955 मध्ये पंडित नेहरुंच्या हस्ते हिन्दूस्तान मशिन टूल्स या कारखान्याचे उद्‍घाटन झाले. भारताच्या औद्योगिक विकासात या कारखान्याचे स्थान महत्त्वाचे मानले जाते.
 • सन 5ऑक्टोबर 1989 मीरासाहेब फातिमा बिबी या सन 1989 मध्ये सर्वोच्‍च न्यायालयातील,पहिल्या महिला न्यायाधीश बनल्या होत्या.
 • सन 5ऑक्टोबर 1995 कुसुमाग्रज प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा जनस्थान पुरस्कार,ज्येष्ठ कवयित्री इंदिरा संत यांना जाहीर झाला होता.
 • 5ऑक्टोबर 1998 मध्ये डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांना इंदिरा गांधी राष्ट्रीय एकात्मता पुरस्कार, जाहीर झाला होता.