24 September 2020-Chalu ghadamodi-current Affairs in Marathi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

24 September 2020-Chalu ghadamodi-current Affairs Marathi,Chalu Ghadamodi 24 September.24 September-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi
Chalu Ghadamodi

Current Affairs In Marathi 24 September 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • पीएम मोदी आणि आयुष्मान खुराना यांनी 2020 च्या 100 सर्वाधिक प्रभावशाली लोक’ या मासिकाच्या यादीमध्ये समाविष्ट केले
 • टाइम मॅगझिननं 2020 च्या जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींची यादी प्रसिद्ध केली आहे. दरवर्षी टाइम मॅगझिनकडून ही यादी जारी करण्यात येते.
 • या यादीत जभरातील निरनिराळ्या क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश केला जातो. या यादीत पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे.
 • अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावापूर्वी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी. जिनपिंग यांना स्थान देण्यात आलं आहे.
 • काश्मिरी, डोगरी आणि हिंदी यांना उर्दू व इंग्रजी व्यतिरिक्त जम्मू-काश्मीरच्या अधिकृत भाषांच्या यादीमध्ये समाविष्ट करण्याचे विधेयक संसदेने मंजूर केले.
 • लडाख सीमेवर चीन बरोबर तणावाची स्थिती असताना संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने (DRDO) एक महत्त्वपूर्ण यश मिळवलं आहे.
 • डीआरडीओने लेझर गाइडेड रणगाडा विरोधी क्षेपणास्त्राची (ATGM) यशस्वी चाचणी केली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी या यशाबद्दल डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.
 • अहमदनगरच्या केके रेंज येथे एमबीटी अर्जुनवरुन या मिसाइलची चाचणी करण्यात आली.
 • परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी भारत-आफ्रिका प्रकल्प भागीदारीवर 15 व्या सीआयआय-एक्झिम बँक डिजिटल कॉन्क्लेव्हला संबोधित केले.
 • गोल्डन अ‍ॅरो’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या राफेलच्या पहिल्या स्क्वार्डनमध्ये एका महिला फायटर पायलटचा समावेश करण्यात आला आहे.
 • फ्लाइट लेफ्टनंट शिवांगी सिंह असे या महिला फायटर पायलटचे नाव आहे.
 • शिवांगी सिंह 2017 साली इंडियन एअर फोर्सच्या सेवेत रुजू झाल्या. त्या दुसऱ्या बॅचमधील फायटर पायलट आहेत.
 • त्या लवकरच अंबाला स्थित ‘गोल्डन अ‍ॅरो’ च्या 17 व्या स्क्वार्डनच्या भाग होतील.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

 • संसदेने परदेशी योगदान (नियमन) दुरुस्ती विधेयक, 2020 मंजूर केले; या विधेयकात विदेशी देणग्या पासून प्रशासकीय खर्चाची मर्यादा सध्याच्या 50%,इतकी आहे.
 • संसदेने तीन कामगार सुधारणा विधेयक मंजूर केले आहेत ज्यामुळे कंपन्या बंद होण्यातील अडथळे दूर होतील आणि 300 हून अधिक कामगार असलेल्या कंपन्यांमध्ये सरकारी परवानगीशिवाय कामगारांना काढून टाकता येईल.
 • लोकसभेने देशातील प्रमुख बंदरांचे नियमन, संचालन आणि नियोजन यासाठी मेजर पोर्ट अथॉरिटी विधेयक 2020 मंजूर केले.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी

 • आंतरराष्ट्रीय संकेत भाषा दिन 23 सप्टेंबर रोजी साजरा करण्यात आला.
 • मूनरेकर (1979) या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार्‍या मायकेल लॉनस्डेल, यांचे निधन झाले

24 September 2020 Dinvishesh

दिनविशेष 24 सप्टेंबर

 • 24 सप्टेंबर 1861 मध्ये भारतीय क्रांतिकारक मॅडम भिकाजी रुस्तुम कामा यांचा जन्म झाला.
 • सन 24 सप्टेंबर 1873 मध्येमहात्मा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली.
 • सन 24 सप्टेंबर 1932 मध्ये पुणे करारावर महात्मा गांधी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पं. मदनमोहन मालवीय, बॅ. मुकुंदराव जयकर आदींच्या सह्या.
 • 24 सप्टेंबर 1948 रोजी होंडा मोटार कंपनीची स्थापना झाली.
 • सन 24 सप्टेंबर 1960 मध्ये अणुशक्तीवर चालणाऱ्या यू.एस.एस. एंटरप्राइझ या जगातील पहिल्या विमानवाहू नौकेचे जलावतरण झाले.
 • माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नेतृवाखाली 24 सप्टेंबर 2007 या वर्षी भारताने टी-20 विश्वकप जिंकला.