21 September 2020-Chalu ghadamodi-current Affairs in Marathi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

21 September 2020-Chalu ghadamodi-current Affairs Marathi,Chalu Ghadamodi 21 September.21 September-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi
Chalu Ghadamodi

Current Affairs In Marathi 21 September 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

  • पंतप्रधान मोदी आज बिहारमध्ये 14,000 कोटी रुपयांच्या, 9 महामार्ग प्रकल्पांची पायाभरणी करतील.
  • शेतकर्‍यांसाठी किमान आधारभूत किंमत सुरू ठेवली जाईल: केंद्र सरकार
  • आजपासून अनेक राज्यांत 9 वी ते 12 वीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळा सुरू केल्या जातील.
  • 52.3 टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत.
  • देशात इंटरनेट वापरकर्त्यांच्यां संख्येत मार्च 2020 च्या संपलेल्या तिमाहीत 3.4 टक्क्यांनी वाढ झाली आहे.
  • त्यामुळे एकूण इंटरनेट युजर्सची संख्या 74.3कोटींवर पोहोचली आहे.
  • या एकूण इंटरनेट युजर्सपैकी सर्वाधिक 52.3 टक्के युजर्स हे एकट्या जिओ नेटवर्कचे आहेत.
  • 23.6 टक्क्यांसह भारती एअरटेल दुसऱ्यास्थानी तर व्होडाफोन-आयडियाची 18.7टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी आहे.
  • टाटा समूहानं सीएसआयआरच्या सहकार्यानं विकसित केलेली फेलुदा कोविड टेस्टिंग किटच्या बाजारात आणण्यास केंद्रीय औषध नियंत्रक विभागाने परवानगी दिली आहे.
  • हे मेड इन इंडिया उत्पादन असून, जे सुरक्षित आहे. विश्वासार्ह असण्याबरोबर आर्थिकदृ्ष्ट्या परवडणारे आहे,” असं आयएसआयआरनं आपल्या निवेदनात म्हटलं आहे.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

  • 4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते:
  • करोना संसर्गावर उपयोगी ठरू शकेल असे एक नवीन औषध शोधल्याचा दावा वैज्ञानिकांनी केला आहे.
  • लॉस एंजल्समधील कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, 4 फेनिलब्युटिरिक अ‍ॅसिड (4 पीबीए) हे औषध प्राण्यांमध्ये कोविडवर गुणकारी ठरले आहे.
  • हे संशोधन ‘सायटोकिन व ग्रोथ फॅक्टर्स रिव्ह्य़ू’ या नियतकालिकात प्रसिद्ध झाले असून कोविड रुग्णात सायटोकिन रेणू जास्त सुटत असतात.
  • 4 पीबीए या औषधाने कोविड 19 रुग्णांच्या मृत्यूची शक्यता कमी होते.
  • कोविड -19 चा सामना करण्यासाठी भारताने मालदीवला 250 दशलक्ष डॉलर्सची मदत दिली.
  • सोमालियाची राजधानी मोगादिशु येथे कार्गो विमान कोसळले.

खेळ चालू घडामोडी-Sports Current Affairs In Marathi

  • आयपीएल 2020: दिल्लीने सुपर षटकात किंग्ज इलेव्हन पंजाबचा पराभव केला.
  • किरेन रिजिजू यांनी लेहमध्ये क्रीडा सुविधांची पायाभरणी केली.
  • मँचेस्टर युनायटेडला इंग्लिश प्रीमियर लीगच्या पहिल्याच सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
  • क्रिस्टल पॅलेसने युनायटेडला 3-1 असे पराभूत केले. एडी नके तिया याने अखेरच्या क्षणी केलेल्या गोलमुळे आर्सेनलने वेस्ट हॅम युनायटेडला 2-1 असे हरवत दुसऱ्या विजयाची नोंद केली.

21 September 2020 Dinvishesh

दिनविशेष 21 सप्टेंबर

  • 21 सप्टेंबर हा दिवस जागतिक अल्झेमर्स दिन तसेच आंतरराष्ट्रीय शांतता दिन म्हणून पाळला जातो.
  • 21 सप्टेंबर 1965 मध्ये गाम्बिया, मालदीव आणि सिंगापूर या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.
  • सन 21 सप्टेंबर 1968 मध्ये रिसर्च अँड अनॅलिसिस विंग (RAW) या भारतीय गुप्तचर संघटनेची स्थापना झाली.
  • सन 21 सप्टेंबर 1971 मध्ये बहारिन, भूतान आणि कतार या देशांचा संयुक्त राष्ट्रात प्रवेश झाला.