17 September 2020-Chalu ghadamodi-current Affairs in Marathi

Share on telegram
Share on whatsapp
Share on facebook
Share on twitter
Share on linkedin

17 September 2020-Chalu ghadamodi-current Affairs Marathi,Chalu Ghadamodi 17 September.17 September-Dinvishesh ,Chalu Ghadamodi For MPSC, MPSC Current Affairs.

Current Affairs In Marathi
Chalu Ghadamodi

Current Affairs In Marathi 17 September 2020-Chalu ghadamodi

राष्ट्रीय चालू घडामोडी-National Current Affairs In marathi

 • गुजरातमधील जामनगरमध्ये असलेल्या आयुर्वेद संस्थांना राष्ट्रीय महत्व देण्याचे विधेयक संसदेने मंजूर केले.
 • उत्तर प्रदेश: पोषण महिन्यात कुपोषित बालकांच्या कुटुंबांना राज्य सरकारकडून गायी दिल्या जातील.
 • आंध्र प्रदेशः तिरुपती लोकसभा खासदार आणि वायएसआर कॉंग्रेस पक्षाचे नेते बाली दुर्गा प्रसाद राव यांचे चेन्नईमध्ये वयाच्या 65 व्या वर्षी निधन.
 • प्रख्यात कला अभ्यासक कपिल वात्स्यायन यांचे वयाच्या 91 व्या वर्षी दिल्लीत निधन झाले.
 • ‘रशियन डायरेक्ट इनव्हेस्टमेंट फंड’ या संस्थेने करोनावरील ‘स्पुटनिक 5’ ही लस भारताच्या डॉ. रेड्डी लॅबोरेटरीजला वितरणासाठी देण्याचे ठरवले आहे.
 • फेसबुकने शेंझेन झेनुआ टेक्नॉलॉजीला बंदी घातली.विद्वान, संशोधक, विचारगट आणि माध्यम संस्था यांच्यासह समाजावर प्रभाव टाकणारे किमान 200 लोक, तसेच महत्त्वाची राजनैतिक पदे भूषवलेले भारतीय विदेश सेवेचे 40 विद्यमान व सेवानिवृत्त अधिकारी यांची नावे चीनच्या झेनुआ डाटा या कंपनीने तयार केलेल्या ओव्हरसीज की इन्फर्मेशन डाटाबेसमध्ये समाविष्ट होती.
 • विदेश सचिव हर्षवर्धन शृंगला यांच्यापासून यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे खासगी सचिव म्हणून काम पाहिलेले भारताचे इस्रायलमधील राजदूत संजीव सिंगला यांच्यापर्यंतचे अधिकाऱ्यांवर या चिनी कंपनीने पाळत ठेवली होती.
 • याशिवाय या कंपनीने हेरगिरी केलेल्या अधिकाऱ्यांमध्ये संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी टी.एस. गुरुमूर्ती आणि संयुक्त राष्ट्रांच्या संयुक्त निरीक्षण पथकाचे सदस्य ए. गोपीनाथन यांचा समावेश आहे.
 • या कंपनीचे व्यवहार बेकायदेशीर नसले, तरी फेसबुकने शेंझेन झेनुआ डाटा टेक्नॉलॉजीला आपल्या व्यासपीठावर बंदी घातली आहे.

आर्थिक चालू घडामोडी-Economy Current Affairs In Marathi

 • सहकारी बॅंकिंग कामांचे नियमन करण्यासाठी आरबीआयला अधिकार देणारी, बँकिंग रेग्युलेशन (दुरुस्ती) विधेयक लोकसभेने मंजूर केले.
 • टाटा प्रोजेक्ट्सने 861.90 कोटी रुपये खर्च करुन, नवीन संसद भवन बांधण्यासाठी बोली जिंकली.
 • आरबीआयचे माजी गव्हर्नर,अमिताभ घोष यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन.
 • एसबीआय आणि टायटन कंपनी कॉन्टॅक्टलेस पेमेंट सर्व्हिसेस टायटॅन पे नावाने,घड्याळांद्वारे सुरू करणार.
 • अँपल ने रक्त ऑक्सिजन संतृप्ति (SpO2) पातळी देखरेख करण्यासाठी, अंगभूत सेन्सरसह वॉच सिरीज 6 लॉन्च केली.
 • 2020-21 मध्ये भारताची अर्थव्यवस्था 10.2 ने कमी होईल; 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्था 4.5 टक्क्यांनी घसरेल: OECD
 • सरकारी विमान कंपनी असणाऱ्या एअर इंडियाला टाळं लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
 • या कंपनीचे खासगीकरण झाले नाही तर कंपनी बंद करण्याची सरकारची तयारी आहे असं केंद्र सरकारने स्पष्ट केलं आहे.
 • कंपनीवर 60 हजार कोटींचे कर्ज आहे. त्यामुळेच या कंपनीचे खासगीकरण किंवा ती बंद करणे हे दोनच पर्याय उपलब्ध आहेत.
 • पुरी यांनी दिलेल्या माहितीनुसार 2011-12 पासून आतापर्यंत केंद्र सरकारने एअर इंडियामध्ये 30 हजार 520 कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

आंतरराष्ट्रीय चालू घडामोडी-International Current Affairs In Marathi

 • इस्त्राईल, युएई, बहरेन यांनी अब्राहम करारावर स्वाक्षरी केली.
 • जपान: योशीहिडे सुगा यांना, देशाच्या संसदेने नवीन पंतप्रधान म्हणून निवडले.
 • ओझोन लेयरच्या संरक्षणासाठी आंतरराष्ट्रीय दिन,16 सप्टेंबर रोजी साजरा केला; विषय: ‘आयुष्यासाठी ओझोन: ओझोन थर संरक्षणाची 35 वर्षे’
 • टोरांटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात मीरा नायरने इफेक्ट मीडियासाठी जेफ स्कोल पुरस्कार जिंकला.

खेळ चालू घडामोडी-Sports Current Affairs In Marathi

 • धोनीचं नेतृत्व कोब्रासारखं- माजी ऑस्ट्रेलियन खेळाडूचं मत.भारतीय कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली. त्याने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत भारतीय संघाचे यशस्वीरित्या नेतृत्व केले.मधल्या फळीतील काही खेळाडूंना सलामीवीर म्हणून संधी देणे, फिरकी गोलंदाजीने डावाची सुरूवात करणे असे काही दमदार निर्णय घेत त्याने आपली कारकिर्द घडवली.IPLमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतानाही त्याने संघाला तीन विजेतेपदं मिळवून दिली.
 • त्यामुळेच अनेक क्रिकेट जाणकारांनी धोनीच्या नेतृत्वकौशल्याचे कौतुक केले. त्यातच ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू डीन जोन्स याने धोनीबद्दल वक्तव्य केलं आहे.
 • धोनी हा एखाद्या कोब्रा सापासारखा आहे. तो समोरच्या खेळाडूकडून चूक होण्याची शांतपणे वाट पाहतो आणि चूक झाली की मग कोब्रासारखा पटकन प्रतिस्पर्ध्याला संपवून टाकतो”, असं ‘क्रिकेट कनेक्टेड’ कार्यक्रमात बोलताना डीन जोन्स म्हणाला.

17 September 2020 Dinvishesh

दिनविशेष 17 सप्टेंबर

 • 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तिदिन म्हणून पाळला जातो.
 • 17 सप्टेंबर 1879 मध्ये स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक आणि द्रविड चळवळीचे प्रणेते पेरियार ई.व्ही. रामस्वामी यांचा जन्म झाला.
 • सन 17 सप्टेंबर 1882 मध्ये महात्मा गांधीच्या पट्टशिष्या, चरित्रकार, परिचारिका व हिंद महिला समाज च्या संस्थापिका अवंतिकाबाई गोखले यांचा जन्म झाला.
 • सन 17 सप्टेंबर 1948 मध्ये हैदराबाद संस्थान भारतात विलीन.